Developer Agreement Notice Hero Image

विकासका सोबत करण्यात येणाऱ्या करारनाम्याबाबत विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस


दिनांक २०/०३/२०२६

विषय: विकासका सोबत करण्यात येणाऱ्या करारनाम्याबाबत (Development Agreement) विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस.

महोदय/महोदया,

सर्व सभासदांना कळविण्यात येते की, ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. भुखंड क्र. ५३, सेक्टर-१५, वाशी ची विकासका सोबत करण्यात येणाऱ्या करारनाम्याबाबत (Development Agreement) विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०५/०४/२०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता गुजरात भवन, मिनी हॉल, ३ रा मजला, सेक्टर-१५ओ, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी सर्व सभासदानी सभेला वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

कोरम अभावी सभा तहकुब करावी लागल्यास त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने सभा घेण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

विषय सूची (Agenda)

१. सभेच्या अध्यक्ष पदाची निवड करणे.

२. इमारत पुनर्विकास प्रक्रियेतील इमारत आराखडा (बिल्डींग प्लॅन) व विकास करारनामा (Development Agreement) यांचे वर्कीग ड्राफ्ट अंतीम स्वरुपात मंजूर करणे.

३. विकास करारनामा (Development Agreement) नोंदणीसाठी सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष, सचिव, व खजिनदार तसेच सोसायटीचे दोन सभासद (दोन साक्षीदार) यांना प्राधिकृत करणे.

४. पुनर्विकास प्रक्रियेसाठी सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव व खजिनदार यांना पॉवर ऑफ Attorney होल्डर म्हणून मान्यता देणे व त्याची नोंदणी करण्यासाठी प्राधिकृत करणे.

सभासदाकरीता विशेष सूचना

१. फक्त मूळ सभासद किंवा सहयोगी सभासद यापैकी एक सभेला उपस्थित राहू शकतील.

२. इतर कोणत्याही व्यक्तीस सभेत प्रक्रिया किंवा चर्चेला सहभागी होण्याची परवानगी नसेल.

३. विषय सूचिनुसार प्रस्ताव मंजुर करण्यापूर्वी सभासदांना ज्या शंका, सूचना हरकती असतील त्या सभेत प्रत्यक्ष उपस्थित राहून विचारणा करावी. ठराव मंजूर झाल्यानंतर सभेस गैरहजर असणाऱ्या सभासदांनी नंतर पत्र व्यवहाराव्दारे काही प्रश्न उपस्थित केल्यास त्यांना कार्यकारी मंडळ लिखित स्वरुपात उत्तर देणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

(संदेश रेणोसे)

सचिव