General Meeting Report April 2024 Hero Image

संस्था नोंदणीनंतरच्या पहिल्या सभेचा वृत्तांत


सन्माननीय सभासद

रविवाद दिनांक १४.०४.२०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा वृत्तांत खालीलप्रमाणे

श्री. सिध्दप्पा भिमाशंकर उमदीकर (मुख्यप्रवर्तक) यांच्या अधिपत्याखाली ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्थेची नोंदणीनंतर विशेष सर्व साधारण सभा दि. १४/४/२०२४ रोजी सांयकाळी ५.३० वाजता संस्थेच्या ऑफिस समोरील पटांगणात आयोजित करण्यात आली होती. परंतु गणसंख्येअभावी सभा अर्धातास तहकूब करण्यात आली व अर्ध्यातासानंतर ठिक ६.०० वाजता सभा त्याचठिकाणी घेण्यात आली. त्यावेळी ९९ सभासद हजर होते.

सभेच्या सुरुवातीला मुख्यप्रवर्तक श्री. सिध्दप्पा उमदीकर यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले व आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

विषय क्र १: सभेच्या अध्यक्षांची निवड करणे

मुख्यप्रवर्तक श्री. सिध्दप्पा उमदीकर यानी आजच्या सभेचे अध्यक्ष निवडताना श्री. विश्वास मोरे यांचे नाव सुचविले. त्यास श्री. शिवराम धराडे यांनी अनुमोदन दिले.

श्री. विश्वास मोरे यानी अध्यक्षस्थान स्विकारण्यास संमती दर्शविल्यानंतर प्रथम आपल्या ओमकार अपार्टमेंट असोसिएशनचे “ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित” असे नामांतर झाल्याबद्दल आतापर्यंत सर्वानी घेतलेल्या प्रयत्नाना यश आल्याब‌द्दल गौरव करून अभिनंदन केले.

विषय क्र. २: प्रवर्तका व्यतिरिक्त ज्यानी संस्थेच्या सदस्यत्वाकरीता अर्ज केले आहेत अशा नविन सदस्याना दाखल करून घेणे.

सदर मुद्दा लागू होत नसल्यामुळे हयावर चर्चा करण्याची गरज नाही असे मुख्य प्रवर्तकानी सांगितले.

विषय क्र. ३: सहकार खात्याकडून मंजूर होवून आलेल्या पोटनियमांची माहिती घेवून ते स्विकारणे.

सहकार खात्याकडून मंजूर होवून आलेल्या पोटनियमांची पुस्तीका सर्वांच्या सहमतीने स्विकारण्यात आली.

विषय क्र. ४: संस्थेच्या उपविधी अधीन संस्थेची नियीमत निवडणूक होईपर्यतच्या कालावधीसाठी हंगामी समिती स्थापन करणे. जनरल सदस्य संख्या ८ इच्छुक उमेदवार

संख्या ११ चे सभेपुढे वाचन करण्यात आले.

इच्छुक उमेदवारांचे अर्ज ११ आले असल्याने अध्यक्ष महोदयासमोर पेच निर्माण झाला. मतदानाशिवाय पर्याय नाही म्हणून अध्यक्ष श्री. मोरे यानी ११ उमेदवाराना आव्हाहन केले की ३ उमेदवारानी आपले अर्ज मागे घेतल्यास मतदानाची प्रक्रिया थांबून ८ जणाची बिनविरोध निवड होईल. अध्यक्षांच्या आव्हाहनास प्रतिसाद देवून

  1. श्री. सतिश घाग

  2. श्री. बबन साळुंखे

  3. श्री. प्रताप भालेराव यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे जनरलमधुन निवडावयाच्या ८ सदस्यांची निवड निश्चित करण्यात आली.

एस सी/एस टी मधुन निवडावयाच्या एका जागेकरीता आलेल्या २ इच्छुक उमेदवारांच्या नावाची नोंद घेण्यात आली. अध्यक्ष श्री विश्वास मोरे यांनी आलेल्या दोन अर्जदारापैकी एकाने माघार घेतल्यास मतदान टळेल असे आव्हाहन केले असता श्री. मनोज ओव्हाळ यानी माघार घेतली त्यामुळे अर्जदार श्री. शिवराम धराडे यांचे नाव विजयी घोषित करण्यात आले.

ओबीसी वर्गामधून श्री. लवू भोवर यांचा एकच अर्ज असल्याने व प्रतिस्पर्धी कोणीच नसल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. VJ/NT/SBC साठी निवडावयाच्या एका जागेकरीता आलेल्या दोन सभासदांचे अर्ज सभेसमोर ठेवण्यात आले. पुन्हा अध्यक्ष महोदयांनी एका अर्जदाराने अर्ज मागे घेतल्यास मतदान टळेल अशाप्रकारे केलेल्या आव्हाहनानंतर श्री. शेंडगे यानी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे श्री. सुरेंद्रनाथ बापर्डेकर विजयी जाहीर करण्यात आले.

महिला राखीव मधुन निवडावयाच्या दोन जागाकरीता आलेल्या ३ महिला सदस्यांच्या अर्जाची नोंद घेण्यात आली.

  1. सौ. अमृता पाटील

  2. सौ. सुप्रिया फापाळे

  3. श्रीमती स्मिता सीताराम पाडावे

अध्यक्ष श्री. मोरे यानी पुन्हा एकदा एक महिला उमेदवाराने माघार घ्यावी असे आव्हाहन केले. परंतु कोणी माघार घेवू न शकल्याने सभेपुढे मतदान घेणे हाच पर्याय उरला.

मतदान गुप्त पध्दतीने होण्याकरीता श्री. देविदास पगार आपल्या सोसायटीचे सदस्य याना मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी अधिकार देण्यात आले.

श्री. देविदास पगार यांच्या अधिपत्याखाली मतदानाची (गुप्त पध्दतीने) संस्थेच्या ऑफिसमध्ये व्यवस्था करण्यात आली आणि त्यानंतर उपस्थित सर्व सभासदानी शांततेने मतदान केले.

मतमोजणी त्याच ठिकाणी घेण्यात आली असता

  1. सौ. अमृता उमेश पाटील - ७६ मते

  2. श्रीमती स्मिता सीताराम पाडावे - ६५ मते

  3. सौ. सुप्रिया फाफाळे - २१ मते

प्राप्त मताधिक्याच्या आधारे नेमलेल्या अधिकारी श्री. देवीदास पगार यानी सौ. अमृता उमेश पाटील ७६ मते व श्रीमती रिमता सीताराम पाडावे ६५ मते याना महिला राखीव विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

अशाप्रकारे कार्यकारी समिती सदस्य संख्या १३ ची यादीचे सभेपूढे वाचन करण्यात आली.

जनरल सदस्य संख्या ८

  1. श्री. विश्वास मोरे

  2. वसंत जोशी

  3. श्री. सिध्दप्पा उमदीकर

  4. श्री. नायालाल गोळे

  5. सुनिल तावडे

  6. संजय अडसूळे

  7.  संदेश रेणोसे

  8. मंगेश जाधव

SC/ST राखीव

  1. श्री. शिवराम धराडे

OBC राखीव

  1. श्री लवू रामचंद्र भोवर

VJ/NT/SBC

  1. श्री सुरेंद्रनाथ बापर्डेकर

महिला राखीव सदस्य संख्या २

  1. सौ. अमृता उमेश पाटील

  2. श्रीमती स्मिता सीताराम पाडावे

अशाप्रकारे १३ सदस्यांची कार्यकारी समिती स्थापन झाल्याचे अध्यक्ष श्री. विश्वास मोरे यानी जाहिर केले आणि सर्वांचे टाळया वाजवून स्वागत करण्यात आले. संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने, पहिल्या सर्वसाधारण सभेच्या दिनांकापूर्वी १४ दिवसाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाचे विवरण करण्यात आलेले पत्र सभेपुढे ठेवण्यात आले. त्याचे वाचन झाल्यानंतर सदरचे विवरणपत्र स्विकारण्यात आले ते सर्वानुमते संमत झाले.

विषय क्र. ६: बाहेरून उभारावयाचा निधी निश्चित करणे (Transfer Fee)

बाहेरून उभारावयाचा निधी जेव्हा एखादा सदनिका विक्री झाल्यानंतर सदनिका मालकाकडून रक्कम रू. २५०००/-ट्रान्सफर प्रिमियम घेण्यात येईल. इन्क्मींग मेंबर कडून रु.५००/- ट्रान्स्फर फी आकारण्यात येईल व सभासद फी (Membership) रु.१००/- आकारण्यात येईल असे सर्वानुमते ठरले.

सूचक : श्री. आनंद मोरे

अनुमोदक : श्री. सुरेंद्रनाथ बापर्डेकर

विषय क्र ७:

मुख्य प्रवर्तकाकडून (बांधकाम व्यवसायी) संस्थेच्या नावे मालमत्तेतील हक्क व हितसंबध हस्तांतरीत करून घेण्याकरीता नवीन कार्यकारिणीकडे सुपूर्द करणे आवश्यक असल्याने ते समितीकडे सुपुर्द करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

विषय क्र. ८: गरज असल्यास त्यावर्षाकरीता अंतर्गत लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व त्याचे पारिश्रमीक ठरविणे.

ओमकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनचे ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित असे नामांतर झाल्यानंतर कामाचे स्वरूप बदलत आहे. एकंदरीत कामाची व्याप्ती वाढलेली आहे. प्रत्येक सभासदाला ३ महिन्यांचे बिल येईल. सदरचे बिल दिलेल्या वेळेत न भरल्यास मेंटेनन्स आकारणीवर १५/२१ टक्के दरसाल दराने व्याज आकारण्यात येईल Monthly Subscription रू.२५०/- असलेले रु.५००/- प्रमाणे आकारण्यात यावेत असा ठराव मुख्य प्रवर्तक उमदिकर यांनी सभेसमोर मांडला असता त्या ठरावास सर्वानुमते मंजरी देण्यात आली त्यामुळे एप्रिल २०२४ पासून मासिक वर्गणी रु.५००/- करणेत आली आहे. सोसायटी स्थापन झाल्यानंतर आम्ही हिसोब तपासणी (सी.ए) यांचेकडे काही महत्वाच्या मुद्दयावर चर्चा केली असता असे समजले की सोसायटीच्या नियमाप्रमाणे सिंकीगफंड हा एक रक्कमी न घेता दरमहा प्रत्येक सभासदाकडून रू. १०/- दहा रूपये एवढा काढावा आणि सोबत रीपेअर फंड प्रत्येक सभासदाकडून रू. ३०/- तीस रूपये एवढा काढावा असे एकूण रु ४०/- दरमहा प्रत्येक सभासदाकडून काढण्यात यावेत. असा ठराव श्री. उमदीकर यांनी सभेसमोर मांडला असता सभेने ठरावास मंजूरी दिली. त्यामुळे आपण दरवर्षी काढत असलेला रु.२००/- सिंकिग फंड बंद करण्यात येत आहे. असे उमदीकर यांनी सांगितले. तसेच सध्या घेत असलेले रेंटल चार्जेस वार्षिक रू.१५००/- बंद करून त्याजागी मेन्टन्सच्या १०% नॉन ऑक्युपेन्सी चार्जेस घेण्याचे ठरले आहे.

चारचाकी वाहनासाठी दरमहा रु.१५०/- व तीनचाकी वाहनासाठी दरमहा रु.१००/- असलेले पार्कीग चार्जेस कायम करण्यात आले.

सोसायटीच्या कामाची वाढलेली व्याप्ती लक्षात घेता सदर कामासाठी सोसायटी कामाचा अनुभव असलेल्या कन्सलटन्सीकडून काम करून घ्यावे असे सर्वाचे मत झाले व तशी कोटेशन मागविण्यात आली होती.

  1. मॅनेज कन्सलटन्सी रू.२५/- परयुनिट पर मंथ

  2. ऑल राउंड सोसायटी सव्हिसेस रू. ३०/- पर युनिट पर मंथ

  3. श्री. सुभाष विचारे रू.४०/- पर युनिट पर मंथ

अशा प्रकारेआलेल्या कोटेशनचे सभेपुढे वाचन करण्यात आले कमीदर असलेल्या मॅनेज कन्सलटन्सीला काम देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

सूचक - श्री. प्रताप भालेराव

अनुमोदक - संदेश रेणोसे

विषय क्र. ९: हंगामी समितीच्या कोणत्याही एका सदस्यास हंगामी समितीची पहिली सभा बोलविण्याचे अधिकार देणे.

एकूण १३ समिती सदस्यांची निवड झाली असताना पुढील कार्यवाहीसाठी कार्यकारिणीची सभा जरूरी आहे. त्याकरीता मुख्य प्रवर्तक श्री. सिध्दप्पा उमदीकर यानी नवीन कार्यकारीणी सदस्य श्री. विश्वासमोरे याना नविन कार्यकारिणी समितीची सभा बोलाविण्याचा अधिकार देण्यात आला.

सूचक - श्री. सिध्दप्पा उमदीकर

अनुमोदक - दिनेश साळुंखे

विषय क्र. १०: जिल्हयाच्या असलेल्या गृहनिर्माण संघाचा व उपविधी क्रमांक ६ मध्ये नमूद केलेल्या इतर संस्था सदस्य म्हणून संलग्न होण्याबद्दल विचार करणे.

तूर्तास आपल्या ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेने नवी मुंबई को. ऑप हाऊसिंग सोसायटीचे सदस्यत्व स्विकारावे व त्या संस्थेची सदस्यत्वासाठी आवश्यक वर्गणी भरावी असे सर्वानुमते ठरले.

सूचक - अॅड. आनंद मोरे

अनुमोदक - री. सुरेद्रनाथ कापर्डेकर

विषय क्र. ११: जे विषय कार्यक्रम घेण्यासाठी योग्य नोटीस देणे आवश्यक आहे ते खेरीज करून अध्यक्षांचे परवानगीने अन्य कोणतेही विषय सभेसमोर ठेवणे.

ओमकार असोसिएशनचे ओमकार सोसायटीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सोसायटीचे व्यवहार, सोसायटी नियम व कामे यामध्ये तुलनात्मक बदल असल्याकारणाने मागर्दर्शनाची गरज भासणार आहे. त्याकरीता आपल्या सोसायटी मधील सदस्या मधून

ज्या व्यक्तीची कायदेविषयक मार्गदर्शक म्हणून नेमणूक करावी व त्यासाठी अॅड. श्री. आनंद मोरे यांची नेमणूक करावी असे सर्वानुमते ठरले.

सूचक : श्री. प्रताप भालेराव

अनुमोदक : श्री. सिध्दप्पा उमदीकर

अशाप्रकारे सभेपुढील कामांची पूर्तता झाल्यानंतर मुख्य प्रवर्तक श्री. सिध्दप्पा उमदीकर यानी सर्वाचे आभार मानले सर्व सभासदांनी आतापर्यंत चांगल्याप्रकारे सहकार्य केल्यामुळेच आपली सोसायटी बनली गेली आता ती चांगल्याप्रकारे काम करेल याची ग्वाही देवून सर्व सभासदांचे पुन्हा एकदा आभार मानले.

त्यानंतर श्री. विश्वास मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेने दाखविलेल्या सहकार्याचा गौरव केला, आता यापुढे अशाच सहकार्याची गरज आहे. एका वर्षासाठी असलेली कार्यकारी समिती चांगल्या प्रकारे काम करून अग्रणी असेल असा विश्वास देवून आजची सभा संपल्याचे जाहिर केले.

आपला विश्वासु,

(श्री. विश्वास बा.मोरे) सभा अध्यक्ष.